नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

naxlite
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती या भागात नक्षलवाद्यांनी हल्ला केला असून, या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे.

उमेश जावळे शहीद झालेल्या जवानाचे नाव असल्याचे समजते. शहीद जावळे हे उस्मानाबादचे रहिवासी असल्याचेही कळते. काल मध्यरात्री नंतर दोन वाजता नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला आहे.

पोलीसांनी या हल्लेखोर नक्षलवाद्यांना शोधण्यासाठीची मोहीम सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून नक्षलींच्या हल्ल्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment