उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात याचिकेवर उद्या सुनावणी

justice
मुंबई – उच्च न्यायालयात मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही जनहित याचिका एका व्यक्तिने दाखल केली असून, या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्यांने मराठा ही जात नसून मराठी भाषा बोलणाऱ्यांचा समुदाय असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार ५०% पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. असे असूनही राज्य सरकारने त्याचे उल्लंघन केले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
राज्य सरकारने मराठा समाजातील कारखानदारांची आणि महाविद्यालयांची यादी सादर करावी अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे.

Leave a Comment