इंग्लंडविरूध्दचा दौरा आव्हानात्मक- धोनी

dhoni

लंडन- आगामी काळात टीम इंडिया इंग्लंडविरूध्द चार कसोटी सामने खेळणार आहे. गत दौ-यावेळी टीम इंडियाला इंग्लंडकडून दारून पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे आगामी काळात होत असलेली इंग्लंडविरूध्दची चार कसोटी सामन्याची मालिका आव्हा‍नात्म्क असणार असल्याचे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी व्यक्त केले आहे.

काही दिवसापूर्वी खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत इंग्लंडचासंघ पराभूत झाला आहे. त्यामुळे ही मालिका गमावावी लागली आहे. त्यामुळे आगामी काळात इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास खालावण्याची शक्यता आहे. मात्र अनुनभवी खेळाडूंसह पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणे हे नवीन आव्हान असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले.

याबाबत अधिक बोलताना धोनी म्हयणाला, ‘इंग्लंडच्या संघाला आगामी काळात मायदेशातील खेळपट्टय़ांची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हा खडतर मुकाबला आहे. इंग्लंडचा संघ संतुलित आहे. त्यामुळे हा तुल्यबळ मुकाबला असणार आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या‍ या मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment