अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समाज आणि देशहितासाठी चांगले काम केले तरच सरकारला पाठिंबा देईल. मात्र, समाजाचा अपेक्षाभंग झाल्यास मोदी सरकारच्या विरोधातही आंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा आज दिला.
अपेक्षाभंग झाल्यास मोदी सरकारच्या विरोधातही आंदोलन : अण्णा हजारे
नगर येथील स्नेहालय संस्थेच्या हिंमतग्राम पुर्नवसन प्रकल्पात अण्णांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे याप्रसंगी उपस्थित होते. अण्णा म्हणाले, केंद्रात आलेले मोदी सरकार जनहिताची कामे करेल, अशी अपेक्षा आहे. तथापि अपेक्षाभंग झाला तर पुन्हा रामलीला मैदानासारखे आंदोलन उभारण्याची आपली तयारी आहे. कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी येत्या दोन महिन्यात देशव्यापी दौरा करणार असल्याचे अण्णांनी या वेळी सांगितले.