सिरियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 57 ठार

seriya
बगदाद – इराकमधील अल अनाबर प्रांतावर सिरियाच्या लष्कराने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 57 नागरिक मारले गेले तर 120 जण जखमी झाले. सिरियाने केलेल्या या हल्ल्यात रूतबा, अल वालिद, कॅममधील बाजारपेठा आणि तेल साठयांना लक्ष करण्यात आले.

सिरियाने हे हवाई अल नुसरा या दहशतवादी संघटनेने इराकमधील इस्लामी दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केल्यामुळे हल्ले केले आहेत. या बाबत सिरियाकडून कोणताही प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आलेली नाही. सिरियाच्या लष्कराने सिरियाच्या उत्तरेला दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरही हवाई हल्ले केले. अमेरिकेने हवाई हल्ले केले तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने दिला आहे.

Leave a Comment