वॉटर बँकेचे प्रणेते अरुण देशपांडे

water3
भारतामध्ये तांत्रिक प्रगती व्हावी यासाठी आय.आय.टी. सारख्या मोठ्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेत ९०, ९५ टक्के मार्क मिळविणारे हुशार विद्यार्थी हजारोच काय पण लाखो रुपये ङ्गी देऊन अशा संस्थांमध्ये शिक्षण घेत असतात. अशा तंत्रज्ञांनी काही शोधही लावले असल्यामुळे भारताच्या प्रगतीला खूप मदत झालेली आहे. त्यांच्या विषयी आपल्याला आदरच आहे. परंतु सगळेच शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. तेवढे शिक्षण त्यांना मिळू शकत नाही. असे असले तरीही त्यांच्यामध्ये एक संशोधक दडलेला असतो. संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धीमत्ता खेड्यातल्याही अशा काही तरुणांना बहाल केलेली असते की, जे तरुण तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा तरुणांनी आणि गरीब अशिक्षित शेतकर्‍यांनी स्वत:च्या शेतामध्ये काम करता करता त्या शेतीला आवश्यक असे काही शोध लावलेले आहेत. आपण करत असलेल्या कामांमध्ये काही अडचणी येत असतात आणि त्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच आपले काम सोपे व्हावे यासाठी काय केले पाहिजे, यावर हे लोक विचार करतात आणि आपल्या तंत्रज्ञ डोक्याचा वापर करून असा काही शोध लावतात की, भले भले शास्त्रज्ञ सुद्धा चकित होऊन जावेत.

सोलापूरजवळ अंकोली येथे चार कोटी लिटर्स पाण्याची वॉटर बँक निर्माण करणारे आणि महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या वतीने माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी विषयक माहिती शेतकर्‍यांपर्यंत पोचवणारे कृषी शास्त्रज्ञ अरुण देशपांडे हे सर्वांना माहीतच आहेत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी वॉटर बँका तयार झालेल्या आहेत. परंतु अशी वॉटर बँक तयार करण्याची कल्पना पहिल्यांदा मांडून तिचा श्रीगणेशा देशपांडे यांनी केलेला आहे. संशोधक बुद्धीच्या आणि तंत्रज्ञ प्रवृत्तीच्या अशा अनेक शेतकर्‍यांच्या संपर्कात श्री. देशपांडे येत असतात आणि त्यांना ते मार्गदर्शनही करीत असतात. देशपांडे यांचे मत असे आहे की, भारताच्या प्रत्येक खेड्यामध्ये जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ होण्याची क्षमता असलेला एक तरी शेतकरी आहे. त्याला मार्गदर्शन मिळत नाही म्हणून तो आपल्या कल्पना सत्यात उतरवू शकत नाही. तरी सुद्धा असे काही तंत्रज्ञ आपापल्या परीने काही ना काही धडपड करत असतात आणि काही तरी तयार करत असतात. राजस्थानमधल्या एका शेतकर्‍याने अशा धडपडीतून शेंगा उकरण्याचे मशीन तयार केली आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे असेच ग्रामीण भागामध्ये लपलेले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ होते. त्यांच्या शिक्षकांना त्यांच्या बुद्धीमत्तेची कल्पना आली आणि योग्य ते मार्गदर्शन आणि शिक्षण मिळत ते एवढ्या मोठ्या पदाला जाऊन पोचले. आपल्याला हे मार्गदर्शन लाभले नसते तर आपण रामेश्‍वर जवळच्या एका खेड्यामध्ये असेच प्रसिद्धीपासून दूर राहून काही तरी खटपट करीत बसलो असतो याची जाणीव डॉ. कलाम यांना आहे. मार्गदर्शन न मिळालेले अनेक छुपे शास्त्रज्ञ ग्रामीण भागात आहेत, हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नॅशनल इनोव्हेशन ङ्गौंडेशन (एन.आय.एङ्ग.) ही संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑङ्ग मॅनेजमेंट अहमदाबाद या संस्थेचे प्रा. अनिल गुप्ता हे या संस्थेचे आता अध्यक्ष आहेत. ग्रामीण भागात आपापल्या परीने संशोधन करून काही शोध लावणार्‍या अशा लपलेल्या शास्त्रज्ञांना शोधून त्यांना प्रकाशात आणण्याचे काम ही संस्था करत असते. या संस्थेतर्ङ्गे दरसाल अशा काही तंत्रज्ञांचा सत्कारही केला जातो. शहरापासून दूर असलेल्या गावांमध्ये राहणारे, शिक्षण न मिळालेले आणि कसलीही तांत्रिक पार्श्‍वभूमी नसलेेले परंतु अतिशय मौल्यवान संंशोधन करणारे काही संशोधक या उपक्रमातून मिळालेले आहेत. या संशोधकांना प्रोत्साहन तर मिळत नाहीच, उलट ग्रामीण भागात त्यांची उपेक्षा होते आणि काही वेळा तर विरोध सुद्धा होतो. तरीही आपले संशोधनाचे काम हे लोक सोडत नाहीत. अशा या शास्त्रज्ञांना एन.आय.एङ्ग. तर्ङ्गे तांत्रिक मदत दिली जाते आणि त्यांच्या संशोधनातून यंत्रे तयार करण्यासाठी त्यांचे उद्योग उभा करण्यास आर्थिक मदतही केली जाते.

तनपुरे यांची सर्वांगीण शेती सुधारणा

अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा या गावातले आदर्श शेतकरी श्री. सुभाष तनपुरे यांनी आपल्या शेतात जे जे काम केले आहे ते पाहिले तर त्यांच्या शेतीला शेत न म्हणता, आदर्श स्वावलंबी शेती प्रकल्पच म्हणावेसे वाटते. सध्या शेती व्यवसाय अडचणीत आहे पण त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे. ते सारे त्यांनी आपल्या शेतात केले आहे.त्यांनी आपल्या शेतात जलसंधारणाचा प्रयोग चांगला केला आहे. शेतकर्‍यांनी अडचणींचा पाढा वाचायचाच म्हटले तर तो पाढा मोठा होऊ शकतो. पण अडचणींवर उपाय योजिण्याचा प्रयत्न केला तर अशा उपायांचीही यादी मोठी होऊ शकते. तनपुरे यांंनी पाण्याच्या अनिश्‍चिततेच्या अडचणीवर असेच अनेक उपाय योजिले आहेत. त्यांनी जमिनीच्या उताराचा विचार करून शेततळे तर तयार केले आहेच पण त्यांच्या शेताच्या जवळून कालवाही गेला आहे. त्याचाही उपयोग त्यांनी केला आहे.
त्याशिवाय शेततळी आणि सिमेंट बंधारे यांची अशी काही रचना केली आहे की त्यांचे शंभर एकर शेत चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि काही प्रमाणात सरकारची मदत घेऊन हे सारे काम केले आहे. अनेकदा शेतकरी विजेची अडचण ङ्गार सांगत असतात. कारण ती आहेच तशी. कधी तरी रात्री वीज येते. ती आली झोपेचा विचार न करता शेतात जाऊन पिकाला पाणी द्यावे लागते. मात्र तनपुरे यांनी या अडचणीवर मात करून वॉटर बॅँक तयार केली आहे. त्यांनी ही वॉटर बॅँक शेताच्या चढाच्या भागात तयार केली आहे. तिची क्षमता एक कोटी २५ लाख लीटर एवढी आहे. लाईट आपल्या लहरीनुसार कधीही आली तरी ते त्यावेळी आपली मोटार चालू करतात आणि विहिरीतले पाणी त्या वॉटर बँकेत जमा करतात. रात्री कधीही लाईट आली तरी विहिरीतले पाणी वॉटर बॅँकेत जमा होण्यात काही अडचण येत नाही. ते तिथे जमा होत राहते. वॉटर बॅँक उंचावर आहे. मग सकाळी आपल्याला पाहिजे त्या वेळी या वॉटर बँकेतले पाणी उताराने शेतात आपोआप येते. एखाद्या धरणातल्या पाण्याप्रमाणे ते पाणी पिकाला देता येते. अडचण तर आहे पण, अडचणीवर उपाय शोधणारांना तो सापडत असतो. या पद्धतीचा आणखी एक ङ्गायदा त्यांनी करून घेतला आहेे. हे पाणी उंचावरून खाली येत असते. मग हा त्याचा प्रवाह वाया कशाला जाऊ द्यायचा ? त्याचा ङ्गायदा घेऊन तनपुरे यांनी त्यापासून वीज तयार केली आहे. त्यांच्या गावाच्या जवळ रेहेकुरी पक्षी अभयारण्य आहे. या निमित्ताने अनेक पर्यटक येत असतात. तनपुरे यांनी हे पर्यटक आपल्याही शेतात यावेत यासाठी आपल्या शेतातही कृषि पर्यटनासाठी काही आकर्षण तयार केले आहे. म्हणजे जाता जाता त्यांनी कृषि पर्यटनाचाही व्यवसाय केला आहे.

Leave a Comment