बिज संशोधन करणारे शेतकरी

seed
भारतामध्ये अनेक अशिक्षित शेतकरी सुद्धा भल्या भल्या लोकांना चकित करील अशी संशोधने आपल्या शेतात करत असतात. महाराष्ट्रात सुद्धा असे शेतकरी आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या नान्नज येथील शेतकर्‍यांनी दर एकरी द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत कॅलिङ्गोर्नियाचा विक्रम मोडलेला आहे. या गावच्या दोन शेतकर्‍यांनी तर स्वत:च्या कल्पकतेने दोन जाती विकसित केल्या आहेत. नानासाहेब काळे यांनी सोनाका आणि शरद पर्पल या दोन जाती विकसित केल्या असून माणिकराव दबडे यांनी माणिक चमन ही जात शोधून काढली आहे. महाराष्ट्रात असे बरेच शेतकरी आहेत. परंतु नॅशनल इनोव्हेशन ङ्गौंडेशन या संस्थेने गौरव केलेल्या शेतकर्‍यांचे तर कौतुक करावे तेवढे थोडे आहे. वाराणसी येथील जयप्रकाश सिंग यांनी हा मान मिळविला आहे. त्यांनी गव्हाच्या, तांदळाच्या आणि वाटाण्याच्या अनेक जाती शोधून काढल्या आहेत. त्यांनी १९९१ पासून राज्य सरकार तर्ङ्गे शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या गव्हाच्या वाणांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यातून काही नव्या जाती शोधून काढल्या. त्यांनी आपल्या या जातींना जयप्रकाश सिंग या नावावरून जेपी मालिकेने सुरू होणारी नावे दिली आहेत. उदा. त्यांनी गव्हाच्या जाती शोधून काढल्या त्यांना जेपी-३३, जेपी-५२, जेपी-६१, जेपी-६४, जेपी-८१ आणि जेपी करिश्मा १०० अशी नावे दिलेली आहेत.

अशाच त्यांनी तांदळाच्या सहा जाती शोधून काढल्या आहेत आणि वाटाण्याच्या सुद्धा सहा जाती शोधलेल्या आहेत. त्यांनी अनेक त्रासांना तोंड देऊन हा सारा उपद्व्याप केला आहे. मात्र आज महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातले शेतकरी जेपी जातीच्या पिकांची लागवड करत असतात. त्यांना नॅशनल इनोव्हेशन ङ्गौंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे. जयप्रकाश सिंग हे शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ नाहीत, ते दहावी नापास झालेले शेतकरी आहेत. गुजरातेतील अमरेली जिल्ह्यातल्या धिरजलाल तुमर या शेतकर्‍यांनीही अशीच धडपड करून रोगापासून मुक्त असलेली भुईमुगाची जात शोधून काढली आहे. त्यांनी २००४ साली जीजी-२० या वाणाचे भुईमूग पेरले होते. मात्र या भुईमुगाला सुकाडो या रोगाची बाधा झाली आणि मोठ्या प्रमाणावर भुईमुगाच्या वेली कुजून मरून गेल्या. तरी सुद्धा त्यातल्याच काही वेली या संकटापासून वाचलेल्या होत्या. त्यांचे धिरजलाल तुमर यांनी बारकाईने निरीक्षण केले. त्या निरीक्षणाचे निष्कर्ष लिहून ठेवले आणि त्यानंतर त्यांचेच वेगळे बियाणे तयार करून त्याची ङ्गेरलागवड केली.

त्यांनी वापरलेल्या जीजी-२० या जातीच्या बियाणांमध्ये चुकून आलेले हे बियाणे होते. पण या मिसळीतून त्यांनी वेगळी जात शोधून काढली. जीजी-२० हा भुईमूग मर रोगाने त्रस्त होत असताना हे बियाणे मात्र त्यापासून मुक्त राहिलेले होते. याचा अर्थ ते मर रोगाला प्रतिकार करणारे बियाणे होते. ते नेमके कोणत्या जातीचे होते हे शास्त्रज्ञांना माहीत नाही. म्हणून धिरजलालने शोधून काढलेल्या या जातीला धिरज-१०१ असे नाव देण्यात आले. गंमत म्हणजे त्यांनी लावलेल्या जीजी-२० या व्हरायटीपेक्षा धिरज-१०१ या व्हरायटीचे उत्पन्न सुद्धा जास्त आहे. कमी पाण्यात हे येते आणि त्यातील तेलाचे प्रमाण जीजी-२० पेक्षा जास्त आहे. जुनागड येथील गळीत धान्य संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी धिरज-१०१ या वाणाचे प्रयोग केंद्रामध्ये केले आणि त्यांना असे आढळले की, हे वाण मर रोगापासून तर मुक्त आहेच पण त्याचे उत्पन्न जीजी-२० पेक्षा दीडपट जास्त आहे. आपले पूर्वज असे सांगत आले आहेत की, शेतात रोज चक्कर मारा, ते शेतच तुम्हाला काय काम करायचे हे सांगेल. धिरजलाल तुमर यांनी नुसती शेतात चक्कर मारलेली नाही तर आपण पेरलेल्या भुईमुगाच्या पिकाकडे आणि त्यातल्या प्रत्येक वेलीकडे बारकाईने नजर ठेवली. त्यातल्या मरणार्‍या आणि न मरणार्‍या वेली या दोन्हींची तुलना केली आणि त्यातून एक व्हरायटी तर निर्माण झालीच पण तिच्या रुपाने धिरजचे नाव अजरामर झाले. संंशोधन संशोधन म्हणजे तरी काय असते ? गरजेनुसार काही तरी नवीन करीत राहिलो की त्यातून आपोआप संंंशोधन निर्माण होते. विद्यापीठातले शास्त्रज्ञ जे करू शकत नाहीत ते एखादा अशिक्षित शेतकरी अशा निरीक्षणातून करू शकतो.

Leave a Comment