नाशिक – राज्याच्या महसूल विभागाकडून दिल्या जाणार्या विविध सोयी सुविधा, दाखले, प्रमाणपत्र यापैकी दहा सुविधा लवकरच ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी ही सेवा सुरु करण्याचा आग्रह मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी धरला असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
लवकरच महसूल विभागाच्या दहा सुविधा होणार ऑनलाइन
सात-बारा उतारे, त्यावरील फेरफार नोंदी, शिधापत्रिका, विविध शैक्षणिक दाखले, बिनशेती परवाना, विविध सरकारी कर भरणे, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, गौण खनिज परवाना यासह विविध प्रकारच्या सेवा-सुविधा महसूल विभागाकडून दिल्या जातात. यांमधील किमान दहा सुविधा ऑनलाइन देण्यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्य सचिवांनी सर्व विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना पत्र पाठविले असून, कोणत्या दहा सुविधा ऑनलाइन देता येतील याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून निवडक दहा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, या सुविधेमुळे सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयात सातत्याने फेर्या माराव्या लागणार नाहीत. या सर्व प्रक्रियेत पारदर्शकताही येणार असल्याचे मत अधिकार्यांनी व्यक्त केले आहे.