माणिकराव ठाकरेंची होणार उचलबांगडी

manikrao
मुंबई – काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या संघटनात्मक फेरबदलानंतर आता काँग्रेसमधेही प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे सलग सहा वर्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या माणिकराव ठाकरे यांची उचलबांगडी होणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसची पुरती वाट लागली. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यासाठी लॉबिंग केले होते. मात्र, चव्हाण यांच्या खुर्चीला कोणताही धक्का लागला नाही, उलट माणिकराव ठाकरे यांचीच खुर्ची आता धोक्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Leave a Comment