बीज बँकेची कार्यपद्धती

seed2
महिलांना आपल्या जवळ बी नसल्यामुळे परावलंबी रहावे लागते आणि पर्यायाने त्या गरीब राहतात हे लक्षात आल्यावर डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेने ही बीज पुरवठ्याची योजना अंमलात आणली. सुरूवातीला अशा एकर दोन एकर जमिनींच्या मालकांना एकत्रित करून त्यांना बी उसने दिले. हा प्रयोग पुरुषांच्या बाबतीत करण्यात आला तेव्हा त्यांनी आपला रंग दाखवला. बर्‍याच लोकांनी पैशांची परतङ्गेड केली नाही. तेव्हा संस्थेने महिलांना एकत्र केले. मीहलांनी इतका सक्रिय सहभाग दिला की ही योजना चांगलीच यशस्वी व्हायला लागली. या योजनेला आता २५ वर्षे होत आली आहेत. पहिल्यांदा एका गावात सुरू झालेली ही योजना पहिल्या दहा वर्षात १८ गावांत सुरू झाली आणि आता ५५ गावांत सुरू आहे.डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीने आधी या महिलांना बियांसाठी पैसे दिले होते पण नंतर त्यांना ङ्गार दिवस सोसायटीवर अवलंबून ठेवायचे नाही असे ठरवले. त्यांनी आता आपला आपला संघ तयार करावा असे सांगितले. ते तयार करण्यास प्रोत्साहन दिले. आणि या गरीब महिलंानी स्वत:चेच एक तंत्र बनवून स्वयंस्ङ्गूर्तीने या कामाला असा काही आकार दिला की संघटन कार्यात अनेक वर्षे घालवलेल्या लोकांनाही आश्‍चर्य वाटावे.

या महिला आता २० बैलगाड्यांची यात्रा काढतात आणि लोकांना बियांचे महत्त्व पटवून देतात. मेदक जिल्ह्याच्या विविध भागांत पूर्वी प्रमुख पिकांच्या शंभरावर जातींचे बियाणे उपलब्ध होते. ही गोष्ट १९५० सालची. पण संकरित बियाणांचा वापर वाढत चालला आणि १९८० साली यातल्या केवळ २५ जातींचे बी शिल्लक राहिले. आता या प्रयत्नांमुळे ही संख्या ८५ ते ९० वर गेली आहे. हे या बीज बँकेचे यश आहे. या महिलांच्या मनात बिया विषयी एवढी जागृती निर्माण झाली आहे की आपले शेतीतले निम्मे यश बियाणांच्या निवडीवर अवलंबून असते हे त्यांच्या ध्यानी आले आहे. बियाणे निवडताना आपण जागरूक राहिलो म्हणून आपल्याला नवे जीवन प्राप्त झाले आहे, आपली गरिबी हटली आहे याचा अनुभव त्यांना आला आहे. नवा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी आजवर हायब्रिड बियाणांना कसून विरोध केला होता. कारण ते आपल्या शेतीवरचे संकट होते हे त्यांना कळले होते आपण असेच संकट बीटी बियाणांच्या रूपाने आले आहे. त्यामुळे यापुढे याही बियाणांना विरोध करायचा त्यांचा निर्णय आहे आणि त्याच्या विरोधासाठी त्यांनी पदर खोचला आहे. या बियाणांना आम्ही थारा देणार नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.

या सार्‍या जागृतीला जोडून या शेतकर्‍यांत एकूणच शेती विषयी नवे विचार रुजायला लागले आहेत.जुन्या काळात मिश्र पिके घेतली जात होती. ती जुनी पद्धत बंद झाली. पण त्या पद्धतीत एका पिकाचा ङ्गायदा दुसर्‍याला मिळत होता. आता या शेतकर्‍यांनी ती पद्धत पुन्हा रूढ केली आहे. एका शेतकर्‍याने तर आपल्या शेतात आपण एकाच एकरात बारा पिके घेत असतो असे सांगितले. डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीचे संचालक पी.व्ही.सतीश हे तर या महिलांतले परिवर्तन पाहून इतके प्रभावित झाले आहेत की, देशातले समग्र जिरायत शेतकरी याच मार्गाने गेेले तर त्यांचा दारिद्य्राचा प्रश्‍न सोडवायला मदत होईल अशी त्यांना खात्री वाटत असते. भारतात १४ कोटी हेक्टर जमीन आहे. त्यातली ८ कोटी ५० लाख हेक्टर जमीन जिरायत आहे. एवढ्या शेतीचे मालक दारिद्य्राशी झुंज देत असतात. त्यांना बीज बँक आणि सेंद्रीय शेती यांचा ङ्गायदा कळला तर तेही मेदक जिल्ह्यापला पॅटर्न यशस्वी करू शकतील.