खगोलशास्त्रज्ञांना सापडला ११ अब्ज वर्षे जुना तारा

tara
वॉशिंग्टन – ९०० प्रकाशवर्ष अंतरावर अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा ‘हिरा’ खगोलशास्त्रज्ञांना सापडला आहे. व्हिस्कॉन्सिन -मिलवौकी विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड काप्लान आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हा शोध लावला आहे. नॅशनल रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी,(एनएआरओ),ग्रीन बँक टेलिस्कोप (जीबीटी) आणि बेसलाइन ऍरे (व्हीएलबीए) यांच्याद्वारे केलेल्या निरिक्षणातून हा शोध लागला आहे.

संशोधकांनी सांगितले की, हा थंड आणि सफेद तारा असण्याची शक्यता आहे. त्याच्या थंडपणामुळे या तार्‍यावरील कार्बनचे स्फटिकांमध्ये रूपांतर झाले असल्यामुळे अवकाशातील पृथ्वीच्या आकाराचा हिरा असल्यासारखा भास होत आहे. हा तारा वयाने ‘मिल्की वे’ आकाशगंगेइतकेच म्हणजे सुमारे ११ अब्ज वर्षे आहे.

कार्बन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेले लहान आकारातील हे तारे अब्जावधी वर्षापासून हळूहळू थंड होत जातात आणि शेवटी फिके पडतात. पृथ्वीपासून या तार्‍याचे अंतर ९०० प्रकाशवर्षे असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

Leave a Comment