किंग खानच्या ड्रायव्हरला बलात्कारप्रकरणी अटक

srk
मुंबई – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या ड्रायव्हरला बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली असून, या ड्रायव्हरने अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्या घरी काम करणा-या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

आरोपी ड्रायव्हरचे नाव राजेंद्र गौतम उर्फ पिंटू मिश्रा आहे. तो साकीनाका येथील रहिवाशी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्रने पीडित तरुणीला शाहरुख किंवा बॉलिवूडमधील इतर बड्या व्यक्तिंच्या घरी काम मिळवून देण्याचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पीडितेला नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिचा लैंगिक छळ केला.

वांद्रा पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक केली आहे. आज त्याला वांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पीडित तरुणी संगीता बिजलानीच्या घरी कामाला आहे. तिचे वय 17 वर्षे असून राजेंद्रला त्याच्या एका मित्राकडून पीडित तरुणीचा नंबर मिळाला होता.

Leave a Comment