17 दिवसांत इराकमध्ये हजारो नागरिकांची हत्या

iraq1
बगदाद – गेल्या 17 दिवसांपासून इराकमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात सुमारे एक हजार निष्पाप नागरिकांची हत्या झाली असल्याची माहिती आज संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे.

इराकमधील विविध भागतील दहशतवाद्यांनी 1075 जणांनाची हत्या केली असून 658 नागरिक गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमींची संख्या वाढत असून त्यात इराकच्या पोलीस आणि सैनिकांचाही समावेश आहे. वेगवेगळ्या ठिकानांवरून अपहरण केलेल्या नागरिकांना कैद करून ठेवले जात आहे.

दहशतवाद्यांनी जिहाद पुकारला असून ते ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणली जात असल्याने त्यांत अनेक जण ठार होत आहे, असेही प्रवक्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment