‘हिट अँड रन’ची सुनावणी ढकलली

salman
मुंबई- साक्षीदारांनी पोलिसांकडे दिलेल्या साक्षीची कागदपत्र गहाळ झाल्याने हिट अँड रन प्रकरणात न्यायालयाने पुढील सुनावणी २५ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे.

‘हिट अँड रन’ प्रकरणातील साक्षीदार कल्पेश वर्मा आणि अमिन शेख यांनी दिलेल्या साक्षीची कागदपत्र गहाळ झाली आहेत. कल्पेश वर्मा हे जे. डब्ल्यू मेरियट हॉटेलचे व्यवस्थापक असून अमिन शेख हा येथील बेकरीत हेल्परचे काम करतो. पोलिसांनी त्यांनी दिलेल्या साक्षीची कागदपत्र गहाळ झाल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने सदर कागदपत्र शोधून काढा असे आदेश वांद्रे पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे.

२३ डिसेंबरपासून नव्याने ‘हिट अँड रन’ प्रकरणाची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाली. यात सर्व साक्षीदार आणि पुराव्यांची पुनर्तपासणी केली जाणार आहे.

२००२ मध्ये सलमान खानने भरधाव वेगाने गाडी चालवत फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. यात चौघे जण जबर जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी चालू आहे.

Leave a Comment