श्रीलंकेचा १६ वर्षांनी इंग्लंडमध्ये विजय

srilnaka
लीड्स: शेवटच्या ओव्हरमधील 2 चेंडू शिल्लक असताना सामना अनिर्णीत होणार अशी चिन्ह असताना शेवटची विकेट गेली आणि श्रीलंकेने 16 वर्षांनी इंग्लंडच्या भूमीत विजय मिळवला.

श्रीलंकेने इंग्लंडसमोर विजयासाठी 350 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेवटचा फलंदाज जेम्स अँडरसन मैदानात उतरला तेव्हा सामन्याची 20 षटके शिल्लक होती. तो तब्बल 55 चेंडू खेळपट्टीवर तळ ठोकून होता. पण अखेरचे दोन बॉल शिल्लक असताना शमिंडा एरांगाने तळाचा फलंदाज जेम्स अँडरसनला रंगना हेराथकरवी झेलबाद केले आणि सामना श्रीलंकेने जिंकला.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने 100 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि कसोटी मालिका 1-0 ने खिशात घातली. श्रीलंकेने पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीत कसोटी मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.
क्रिकेटच्या इतिहासातील रोमांचक सामन्यांमध्ये या कसोटीचा समावेश होईल. सामना अनिर्णित होणार असं स्पष्ट असताना, इंग्लंडने सामना गमावला आणि मालिकाही.

इंग्लंडने सुरुवात चांगली केली. पण ज्यो रुट आणि मॅट प्रायर बाद झाल्यानंतर मोईन अलीकडून इंग्लंडला अपेक्षा होती. त्याने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवत नाबाद 108 धावांची खेळी केली. मोईनने इतर फलंदाजांना हाताशी घेत सामना ड्रॉ करण्याची संपूर्ण तयारी केली होती.

दरम्यान, याआधीचा सामनाही अटीतटीचा झाला होता. मात्र पराभव होणार असं दिसत असताना श्रीलंकेला तो सामना ड्रॉ करण्यात यश आलं.

इंग्लंडचा संपूर्ण संघ 249 धावांत गारद झाला. मोईन अली 108 धावांवर नाबाद राहिला. धम्मिका प्रसादने 50 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. रंगना हेराथने 3 आणि नुवान प्रदीप आणि एरंगाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

श्रीलंकेने 16 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय साजरा केला आहे. लंकेने आपल्या क्रिकेट इतिहासात इंग्लंडमध्ये केवळ तीन कसोटी सामने जिंकले आहेत. याआधी 1998मध्ये ओव्हल, 2006 मध्ये ट्रेंट ब्रिजमध्ये कसोटी सामना जिंकला होता.
मात्र इंग्लंडच्या मोईन अली हा सामना अतिशय दुर्दैवी ठरला. सामना वाचवण्यासाठी मोईन अलीने साडे सहा तास खिंड लढवली आणि नाबाद 108 धावा केल्या. विशेष म्हणजे कसोटीतील हे त्याचे पहिले शतक होते.

Leave a Comment