लवकरच सुरु होणार भारत-म्यानमार बससेवा

border
नवी दिल्ली – मोदी सरकारने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध बनविण्याच्या दिशेने एक नवे पाऊल उचलणार आहे. शेजारी देशांमध्ये जाण्यासाठी सीमापार करत एक साप्ताहिक बससेवा सुरु होणार आहे. ही बससेवा इंफाळ, मणिपूर आणि म्यानमारच्या मंडालेसाठी सुरू होणार आहे.

ऑक्टोबरमध्ये भारत-म्यानमार दरम्यान बससेवा सुरू होणार आहे. ही बस इंफाळ ते मंडाले 579 किलोमीटरचे अंतर 14 तासात गाठणार आहे. परंतु याचे प्रवासभाडे मात्र निश्चित करण्यात आलेले नाही. अधिकाऱयांनुसार प्रवासभाडे 2 हजार रुपयांपेक्षा कमीच ठेवले जाणार आहे. याचबरोबर दोन्हीकडच्या प्रवाशांना `व्हिसा ऑन अरायव्हल’ दिला जाणार आहे.

सध्या भारत आणि म्यानमारमध्ये कोणताही थेट रस्ता नाहे. तेथे जाण्यासाठी आधी दिल्लीहून बँकॉकला जावे लागते आणि नंतर म्यानमारला जाण्यासाठी रंगून साठी उड्डाण भरावे लागते.

Leave a Comment