राज्यावर पाणी टंचाईची ‘टांगती तलवार’

water
मुंबई – पाऊस लांबल्यामुळे सध्या राज्यभरात पाणीकपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ७ जूनला महाराष्ट्रात येणारा मान्सून जून महिना संपत आला तरी बरसलेला नाही. याचमुळे महाराष्ट्रावर पाणी टंचाईची’ टांगती तलवार’ आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधील साठा केवळ महिनाभर पुरणारा असल्याने राज्यातील नागरी भागात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये 2012 च्या जूनमध्ये केवळ 13 टक्के साठा होता; पण यंदा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने मोठ्या शहरांमधील नागरिकही संभाव्य पाणीटंचाईच्या भीतीने हवालदिल झाले आहेत.

20 धरणांमध्ये शून्य साठा – राज्यात मोठ्या धरणांमध्ये 20 टक्के साठा शिल्लक असला तरी त्यातील 20 प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. या प्रकल्पांमध्ये भीमा, उजनी, घोड, मुळशी (पुणे), टेमघर, पुणेगाव, पालखेड, मुकणे, भावली, वाघाड, तिसगाव (नाशिक), पोथरा (भंडारा), बाघ कालीसरार (भंडारा), सीना वेळेगाव, निम्न तेरणा (उस्मानाबाद), मांजरा (बीड), पूर्णा सिद्धेश्‍वर (परभणी), वैतरणा (ठाणे), विहार (मुंबई) यांचा समावेश आहे. मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या असलेल्या पाणीसाठ्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे ;मुंबई – 20 टक्के,नागपूर – 45 टक्के, अमरावती – 30.40 टक्के,नाशिक : 42 टक्के, औरंगाबाद – 5 टक्के,जळगाव – 36.58 टक्के, नंदुरबार – 33.23 टक्के,धुळे – 32.34 टक्के, बीड – 0 टक्के,नांदेड – 13 टक्के, कोल्हापूर – 28 टक्के,ठाणे – 16 टक्के

Leave a Comment