न्यूयॉर्कमध्ये वाघसिहांबरोबर सेल्फी काढण्यावर बंदी येणार

selfie
न्यूयॉर्क – अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्याने वाघसिहांबरोबर सेल्फी काढण्यावर बंदी आणणारे बिल मांडले अ्राहे. हे बिल पास झाले तर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. या कायद्यानुसार असे सेल्फी काढणार्‍यांना ५०० डॉलर्स म्हणजे ३० हजार रूपये दंड केला जाणार आहे.

अ्मेरिकेत वाघ सिहांबरोबर सेल्फी काढण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. असे अनेक फोटो ऑक्युपिडवर पॉप्युलर ठरले आहेत. त्यामुळे हा ट्रेंड असाच वाढत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यावर वेळीच प्रतिबंध यावा म्हणून मॅनहटन येथील लोकप्रतिनिधी लिंडा रेसिन्थल यांनी या प्रकारावर बंदी आणणारे बिल सादर केले आहे.

या बिलनुसार लोक माकडे, अस्वले यांच्याबरोबर सेल्फी काढू शकतील पण वाघ सिहांबरोबर मात्र सेल्फी काढता येणार नाहीत. अर्थात या बिलचे कायद्यात रूपांतर करणे वाटते तेवढे सोपे असणार नाही. कारण अशा वाघसिंहांबरोबरच्या सेल्फी प्रसिद्ध झाल्या तरी त्या न्यूयॉर्कमध्येच काढल्या गेल्या आहेत हे सिद्ध करणे अवघड आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment