तिकिटाच्या अपेक्षेने येणाऱ्याना सेनेत थारा नाही ; उद्धव ठाकरे

uddhav
पुणे : तिकीटाच्या अपेक्षेने कुणी शिवसेनेमध्ये येत असेल तर अशा माणसांची मला गरज नाही.असे रोखठोक विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून संधीसाधुना इशारा दिला आहे.

पुण्यात एका कार्यक्रमांत बोलताना ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करताना राज्याच्या विकासासाठी झटणारे तानाजी मालुसरें सारखे मावळे आता मला पाहिजेत. तिकीटाच्या अपेक्षेने कुणी शिवसेनेमध्ये येत असेल तर अशा माणसांची मला गरज नाही.असेही त्यांनी स्पष्ट केले. आषाढी एकादशीला केल्या जाणाऱ्या विठ्ठल पूजेचा मान मुख्यमंत्र्यानाच का? असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना उद्धव म्हणाले, मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षा सगळ्यांच्याच मनात असतात.शिवबंधनाबाबत ते म्हणाले, शिवबंधन धाग्याने काय होणार? अशी टीका समाजाच्या विविध स्तरातून माझ्यावर झाली. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीनंतर सर्वांना त्याचे उत्तर मिळाले . मुळात ज्याला शिव याचा अर्थच माहित नाही, त्यांना त्याचे महत्व काय असणार.असेही ते म्हणाले.

युतीच्या काळात शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न असलेला मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पूर्ण केला. मात्र त्याचे श्रेय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतले. त्यामुळे आघाडीला लोकसभेत पडलेला फटका पुरेसा नाही, त्यांना विधानसभेतही मोठा फटका देऊ असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment