कोलंबियाकडून जपान पराभूत

fifa

साओ पावलो – फुटबॉल विश्वचषक स्पार्धेतील ग्रुप सी मधील कोलंबिया जपानमधील लढत एकतर्फी झाली. या सामन्यात सुरुवातीपासून कोलंबियाने वर्चस्व निर्माण करीत आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत कोलंबियाने शानदार खेळाचे प्रदर्शन करत जपानला ४-१ ने पराभूत केले. या विजयाने कोलंबियाने बाद फेरीत प्रवेश केला असून बाद फेरीत कोलंबियाची गाठ उरुग्वेसोबत होणार आहे.

या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्यामुळे जपानचे स्पर्धेतीलआव्हान संपुष्टात आले आहे. जपानच्या यासुयूकी कोनोने गोल क्षेत्रात अड्रीयन रामोसला पाडल्याने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला कोलंबियाला पेनल्टी किक मिळाली. जुआन कुड्राडोन या पेनल्टीव्दारे गोल करत कोलंबियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.त्यानंतर ४५ व्या मिनिटाला शिनजी ओकाझाकीने केईसुके होंडाकडून मिळालेल्या पासवर शानदार हेडरव्दारे जपानला बरोबरी साधून देणारा गोल डागला.

त्यानंतरच्या काळात कोलंबियाने आपला खेळ उंचावत सलग तीन गोल करत जपानला कुठलीही संधी दिली नाही. जॅकसनने ५५ व्या आणि ८२ व्या मिनिटाला सलग दोन गोल केले. सामना संपताना ९० व्या मिनिटाला जेम्सने कोलंबियासाठी चौथा गोल केला.जॅक्सनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Leave a Comment