मुंबई – मोबाईल कंपनी ब्लॅकबेरीने आपला नवा आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारा स्मार्टफोन Z3 लॉन्च केला आहे.
सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारा ब्लॅकबेरीचा Z3
कंपनीने वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा स्मार्टफोन मोबाईल सादर केला होता. आपली ढासळलेली विक्रीचा आलेख उंचावण्यासाठी हा फोन मदत करू शकेल, अशी खात्री कंपनीला वाटते आहे.
या स्मार्टफोनची २५०० एमएएच बॅटरी एवढी असून, जी १५ तासांचा टॉकटाम देते. तसेच हा फोन स्टॅन्डबाय मोडवर ठेवला असता १६ दिवसांपर्यंत सुरू राहू शकतो. हा स्मार्टफोन केवळ काळ्या रंगात उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची विक्री 2 जुलैपासून सुरू होणार आहे. हा फोन मोबाईल स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ब्लॅकबेरीच्या खास दुकानांत उपलब्ध असेल. फ्लिपकार्ट प्री बुकिंगवर 1,000 रुपयांचं फ्री वाऊचरही देणार आहे.