नवी दिल्ली – लवकरच भारतीय भाषांमध्येही जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलमधील केवळ इंग्रजी भाषेला सपोर्ट करणारे व्हॉईस सर्चचा वापर करता येणार आहे.
लवकरच भारतीय बोलीभाषेत गुगलचे ‘व्हॉईस सर्च’
इंग्रजी भाषेलाच गुगलचे उत्पादन असलेले व्हॉईस सर्च केवळ सपोर्ट करते. मात्र भारतातील अन्य भाषांमध्ये व्हॉईस सर्चचा वापर करता यावा यासाठी गुगल प्रयत्नशील आहे. यासाठी कंपनी संपूर्ण देशातून ७०० उमेदवारांकडून विविध आवाजांचे नमुने गोळा करणार आहे. त्यानंतर व्हॉईस सर्च सिस्टीम या भाषांना सपोर्ट करते का याचा अभ्यास केला जाणार आहे.
गुगल इंडियाचे मार्केटिंग प्रमुख संदीप मेनन यांनी सध्या गुगल व्हॉईस सर्च संपूर्ण जगभरातील ४७ भाषांना सपोर्ट करते. भविष्यात भारतातील भाषांनाही गुगल व्हॉईस सर्च सपोर्ट करु शकते असा विश्वास व्यक्त केला आहे. अँड्रॉईड २.३ व्हर्जनपुढील स्मार्टफोनमध्ये गुगलच्या व्हॉईस सर्चची सुविधा उपलब्ध आहे. तसेच क्रोम ब्राऊझरच्या सहाय्यानेही आयओएस आणि संगणकात व्हॉईस सर्च वापरता येऊ शकते.