राजकारणात कधीच येणार नाही – मिशेल ओबामा

obama
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर राजकारणात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याने मिशेल ओबामा हिलरी क्लिटंन यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असल्याचे सूत्रांकडून समजते. एका कार्यक्रमात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांना त्यांचा पुढील प्रवास राजकारणात असणार का?, असे विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी याला नकारार्थी उत्तर दिले. माझा पुढील प्रवास ध्येयपूर्तीसाठी असेल आणि त्यात अधिक भार सामाजिक सेवांवर असेल, ही बाब मिशेल ओबामा यांनी स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्याने त्या भविष्यात राजकारणात सक्रिय होणार, या अफवांचे आपोपाअ खंडन झाले आहे. हिलरी क्लिटंन यांनी त्यांचे पती, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांच्यानंतर राजकारणात सक्रिय प्रवेश केला होता. बराक ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मिशेल यांनी शाळांमध्ये देण्यात येणारे माध्यान्ह भोजन अधिक सकस असावे, याबाबत चळवळ उभी केली होती. त्यांच्या या पावलामुळे रिपब्लिकन पक्षात अंतर्गत धुसफूस झाली होती.

Leave a Comment