नवी दिल्ली – आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या भारतीय हॉकी संघांची नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या हॉकीची जागतिक क्रमवारी नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
भारतीय हॉकी संघाची क्रमवारीत घसरण
नुकत्याच हॉलंडमध्ये झालेल्या हॉकी वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरीमुळे भारत १४५८ गुणांसह नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर या स्पर्धेत भारताकडून ३-० ने पराभूत झालेला दक्षिण कोरिया संघ आठव्या स्थानावर आहे.
या क्रमवारीत जगज्जेता ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर वर्ल्डकपमध्ये उपविजेता संघ नेदरलँड दुस-या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ जर्मनी तिस-या, बेल्जियम चौथ्या, इंग्लंड पाचव्या आणि न्यूझीलंड सहाव्या स्थानावर आहे. तर स्पेन दहाव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे महिला हॉकी संघाच्या क्रमवारीत भारत १३ व्या स्थानावर आहे.