भाजपाचे मेट्रो तिकीटवाढीविरोधात आंदोलन

bjp
मुंबई – भाजपा कार्यकर्त्यांनी आज मेट्रोच्या तिकीटदरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ एमएमआरडीएच्या ऑफीससमोर निदर्शने केली. भाजपा युवा व महिला सघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बांद्रा -कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मेट्रोचे तिकीट दर कमी करावेत अशी मागणी केली. तसेच मुख्यमंत्री व रिलायन्सचे साटेलोटे असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.

राज्य सरकारने मेट्रो तिकीटाचे दर वाढवू नयेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ८ जुलैपासून मेट्रोच्या तिकीटाचे नवे दर लागू होणार आहेत. रिलायन्सच्या पत्रकानुसार मेट्रोचे किमान भाडे १० रुपये तर कमाल भाडे ४० रुपये इतके असेल. मेट्रोच्या तिकीट दरावरून ब-याच काळापासून राज्य सरकार व रिलायन्समध्ये वादावादी सुरू होती. मेट्रोचे किमान भाडे ९ रुपये व कमाल भाडे १३ रुपये असा दर सरकारने निश्चित केला होता. मात्र मेट्रो प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे काण पुढे करत हे दर १०,२०,३० व ४० रुपये असे ठेवण्यावर रिलायन्स ठाम होती. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती, सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिका फेटाळल्याने आता नवे दर लागू होतील.

Leave a Comment