प्रीतीचा पोलिसांना उलट सवाल

zinta
मुंबई – प्रीती झिंटाने विनयभंग प्रकरणी आपला जबाब नोंदवला. वानखेडे स्टेडियम, बी.सी.सी.आयचे कार्यालय आणि वानखेडे स्टेडियम परिसर अशा तीन ठिकाणी पंचनाम्यासह प्रीतीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

यावेळी अधिका-यांनी प्रीतीला रवी पुजारी बाबत विचारले असता “कोण रवी पुजारी, मी फक्त रवी शास्त्री आणि चतेश्वर पुजारा या दोघांनाच ओळखते” असं उत्तर तीने खंडणी विरोधी पथकाच्या अधिका-यांना दिले.

आपला धमकी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे प्रीतीने पोलीसांना सांगितले. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Leave a Comment