पेशावर विमानतळावर विमानावर गोळीबार- महिला प्रवासी ठार

pak
पेशावर – पेशावर येथील बचाखान आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानावर झालेल्या गोळीबारात १ महिला प्रवासी ठार तर विमानातील दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. एअरबस अे ३१० या जातीचे हे विमान रियाधहून पेशावरला आले होते. विमान रनवेवर अंतिम टप्प्यात पोहोचले असताना अज्ञात बंदुकधार्‍यांनी विमानावर ५ ते ७ गोळ्या झाडल्या असल्याचे समजते. या विमानात ७८ प्रवासी होते.

जखमींना कंबाईंड मिलीटरी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून विमानावर झाडण्यात आलेल्या गोळ्या विमानतळाजवळ असलेल्या निवासी भागातून झाडल्या गेल्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विमानतळावर दक्षतेचे आदेश देण्यात आले असून पोलिसांनी संशयितांसाठी शोध मोहिम हाती घेतली आहे.

८ जून रोजी कराची विमानतळावर १० ते १२ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात २९ जणांना मृत्यू अ्राल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा हा प्रकार घडला आहे. कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सर्वच विमानतळांवरील सुरक्षा वाढविली गेली होती. तरीही विमानावर गोळ्या झाडण्याच्या प्रकार पुन्हा घडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे समजते.

Leave a Comment