पुन्हा वादाच्या भोवर्‍यात मॅराडोना

maredona
रिओ दि जानेरियो – पुन्हा एकदा अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. मॅराडोना यावेळी मध्यमा बोट दाखवून अश्‍लील वर्तणूक केल्यामुळे विवादात सापडला आहे. मॅराडोनाने अर्जेंटिना फुटबॉल संघाचे अध्यक्ष जुलियो ग्रोंडोनाला मधले बोट दाखवले. अर्जेंटिना आणि इराण यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान मॅराडोना आपल्या मुलीसोबत उपस्थित होता. सामना संपताच मॅराडोना तातडीने स्टेडियम बाहेर गेला. त्यामुळे मॅराडोना मेस्सीने केलेला निर्णायक गोल बघू शकला नाही. यावर अर्जेंटिना फुटबॉल संघाचे अध्यक्ष ग्रोंडोनाने म्हणाले की, मॅराडोना बाहेर गेल्यामुळे अर्जेंटिनाने गोल केला. नाहीतरी तो अपशकुनीच आहे. हे एकल्यानंतर, मॅराडोना ग्रोंडोनाच्या या गोष्टीमुळे चांगलाच भडकला. त्यामुळे मॅराडोनाने ग्रोंडोनाच्या या बोलण्यामुळे त्याला मध्यमा बोट दाखवले. ग्रोंडोना हे १९७९ पासून अर्जेंटिना फुटबॉल संघाचे प्रमुख आहेत.

Leave a Comment