जीवनगौरव पुरस्काराने स्वराज पाल सन्मानित

paul
लंडन – शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रसिद्ध उद्योजक लार्ड स्वराज पाल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंडला पाल यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जवळ आणण्याचे अनेक प्रयत्न केले.

पाल यांना लंडनमधील मादाम तुसाद म्युझीयममध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पाल म्हणाले, भारत शिक्षण क्षेत्रात संपूर्ण जगाचे नेतृत्त्व करू शकतो. कोणत्याही सरकारने शिक्षण क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे. भारताचे नवे सरकार शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे भारतात जागतिक स्तरावरील विश्वविद्यालयांची गरज असल्याचे पाल म्हणाले.

Leave a Comment