ग्रीस पहिल्यांंदाच बाद फेरीत

greece

फोर्टालेझा – फुटबॉल विश्वचषक स्प‍र्धेतील सामने जसे-जसे पुढे सरकत आहेत. त्या प्रमाणात लढती रंगतदार ठरत आहेत. शेवटपर्यंत बरोबरीत सुटेल अशी वाटणारी लढत अतिरिक्त वेळेत जॉर्जियॉस सामारासने पेनल्टी किकव्दारे साकारलेल्या गोलच्या जोरावर ग्रीसने आयव्हरी कोस्टवर २-१ ने विजय मिळवला आहे. या विजयासोबत ग्रीसने ग्रुप सी मधुन बाद फेरीत प्रवेश केला. ग्रीसने प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे.

ग्रीस- आयव्हरी कोस्ट या संघातील लढत अटातटीची ठरली सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला अँड्रीयस सामरीसने ग्रीससाठी पहिला गोल केला. त्यानंतर आयव्हरी कोस्ट बरोबरी साधण्याचे जोरदार प्रयत्न केला. अखेर सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला विल्फ्रेड बोनीने गोल डागत आयव्हरी कोस्टला बरोबरी साधून दिली.

त्यानंतर निर्धारीत ९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी परस्परांना यश मिळू दिले नाही.अतिरिक्त वेळेत जियोवानी सियोच्या चूकीमुळे ग्रीसला पेनल्टी किक मिळाली. गोलपोस्टजवळ जियोवानीने सामारासला रोखल्याबद्दल पंचांनी ग्रीसला पेन्लटी बहाल केली.सामारासने कोणतीही चूक न करता या पेन्लटीचे गोलमध्ये रुपांतर करुन, ग्रीसचे पुढच्या फेरीतील स्थान निश्चित केले.ग्रीसच्या सामारासला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Leave a Comment