क्रोएशियला नमवून मेक्सिकोचा बाद फेरीत प्रवेश

fifa3

फोर्टालेझा – विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ‘अ’ गटातील सामन्यारत मेक्सीजकोने क्रोएशियाचा पराभव करीत ३-१ असा विजय मिळविला आहे. या सामन्यात विजय मिळविल्याने मेक्सीको संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीतील सामन्याुत ‘अ’ गटातून ब्राझील आणि मेक्सिको हे दोन संघ दुस-या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आल्यामुळे क्रोएशियन फुटबॉलरसिकांच्या दु:खाला पारावार नाही. रविवारी बाद फेरीत मेक्सिकोची गाठ आता नेदरलँड्सशी पडणार आहे.

अनुभवी कर्णधार राफेल माक्र्वेझ हा मेक्सिकोच्या विजयाचा शिल्पकार ठरला. क्रोएशियामधील हॉटेल्स, चौक, आदी महत्त्वाच्या ठिकाणी साऱ्यांनीच या सामन्यासाठी मोठी गर्दी केली होती. क्रोएशियाचा संघ साखळीतील अखेरचा सामना जिंकून आपले आव्हान टिकवेल, अशी त्यांना आशा होती. परंतु दुस-या सत्रातील फक्त दहा मिनिटांत मेक्सिकोने नोंदवलेल्या तीन गोलमुळे क्रोएशियाच्या आशा मावळल्या.

माक्र्वेझने ७२व्या मिनिटाला गोल झळकावून मेक्सिकोचे खाते उघडले. मग आंद्रेस गुर्दादोने ७५व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला आणि त्यानंतर ८२व्या मिनिटाला बदली खेळाडू जेव्हियर हर्नाडीझने तिस-या गोलची नोंद केली. गुर्दादोच्या दुस-या गोलनंतर क्रोएशियामधील टीव्हीवर ‘स्वप्नांना निरोप’ असे भाष्य करण्यात आले होते. परंतु, सामना संपल्याची शिट्टी रेफ्रीनी वाजवण्यापूर्वी काही मिनिटे आधी इव्हान पेरिसिकने क्रोएशियाच्या गुणफलकावर पहिला गोल झळकावला.

Leave a Comment