उदयनराजे भोसलेंचा राष्ट्रवादीला घरचा अहेर

udyanraje
सातारा – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरपणे अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे, मात्र राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करीत एकप्रकारे राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. दोन महिन्यांवर निवडणूक आली असताना त्यांना बदलून काहीही फायदा होणार नाही, चव्हाण हे स्वच्छ प्रतिमेचे असून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाव्यात असा सल्ला देखील त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे.

आत्तापर्यंतच्या सर्वाधिक जास्त फायलींचा निपटारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. वैयक्तिक कामांपेक्षा जनहिताची काम करण्याकडे त्यांचा जास्त भर असतो असा टोलाही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात लगावला.

Leave a Comment