अॅपल आणतेय मोठ्या स्क्रीनचे आयफोन

apple

दक्षिण कोरियातील बलाढय कंपनी सॅमसंगशी असलेली स्पर्धा तीव्र करण्यासाठी अॅपल ने मोठ्या आकाराचे आयफोन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनचे उत्पादन चीनमध्ये सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. ४.७ इंच आणि ५.५ इंचाचा डिस्प्ले असलेले हे फोन पुढच्या महिन्यात बाजारात दाखल होतील असे समजते. सप्टेंबरमध्ये हे फोन रिटेलर्सकडे पाठविले जाणार आहेत.

अॅपलच्या एकूण उलाढालीत निम्मा वाटा स्मार्टफोन विक्रीचा आहे. मात्र सॅमसंगशी तुलना करता अॅपल स्मार्टफोन व्यवसायात सतत मागे पडत चालले आहे. सॅमसंगच्या मोठ्या डिस्प्लेच्या फोनना आशिया व अन्यत्र मिळत असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन अॅपलने नवीन व्हर्जनचे हे आयफोन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हॉनहाय प्रिसिजन उद्योगात या फोनचे उत्पादन केले जाणार असून या कंपनीने मेन लँड चायना मध्ये नुकतीच १ लाख कर्मचार्‍यांची भरती केली आहे. या कंपनीची आणि चीनमधीलही ही सर्वात मोठी नोकरभरती आहे असेही समजते.

Leave a Comment