अमेरिकन सैनिक इराकमध्ये पोहोचले

iraq
बगदाद- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कांही दिवसांपूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे अमेरिकन सैनिकांच्या दोन तुकड्या बगदाद जवळ सुन्नी बंडखोरांच्या कारवाया सुरू असलेल्या जागी पोहोचल्या आहेत. एकूण ३०० सैनिकांपैकी सध्या ४० सैनिक बगदादच्या बंडखोरांनी कब्जा केलेल्या उत्तर पश्चिम भागात तर ९० सैनिक बगदाद कमांड सेंटरवर दाखल झाले असल्याचे समजते. इराकने सुन्नी बंडखोर व आयएसआयएस संघटनेविरोधात कारवाई करण्यात अमेरिकेची मदत मागितली होती. त्यानुसार अमेरिकेने ही मदत दिली असली तरी हे सैनिक युद्धात सामील होणार नाहीत तर इराक सैन्याला ते सल्ला आणि गुप्त माहिती संदर्भातील सहाय्य देणार आहेत.

इराक सरकारने बंडखोरांविरोधात अमेरिकेने हवाई हल्ले करावेत अशी विनंती केली आहे मात्र त्यावर अजून अमेरिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही असे परदेशमंत्री जॉन केरी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ५०-५० सैनिकांच्या आणखी दोन तुकड्या इराकी सैन्याच्या मदतीसाठी लवकरच रवाना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment