सीमा सुरक्षा दलात मेगा भरती

seema
मुंबई – सीमा सुरक्षा दलात मेगा भरती होत आहे. सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात ४९६ पदांची भरती होणार आहे. तसेच सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात पॅरामेडिकल विभागतही ३७ पदे भरणअयात येणार आहेत.

सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात एएसआय – आरएम (६८ जागा), हेड कॉन्स्टेबल – आरओ (४१७जागा), हेड कॉन्स्टेबल – फिटर (११ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ७ जुलै आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ जून ते १३ जूनच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

तर, सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात पॅरामेडिकल विभागातही ३७ पदांची भरती होणार आहे. यामध्ये एसआय – स्टाफ नर्स (८ जागा), एएसआय-औषधनिर्माता (२० जागा), एएसआय/ओटी टेक्निशियन (२ जागा), एएसआय-फिजिओथेरफिस्ट (१ जागा), हेडकॉन्स्टेबल – इलेक्ट्रिशियन (१ जागा), कॉन्स्टेबल-ड्रेसर (१ जागा), कॉन्स्टेबल-शिपाई (१ जागा), कॉन्स्टेबल-मशालची (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.

यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ जून ते २० जूनच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

Leave a Comment