वोडाफोनने केली इंटरनेट दरात वाढ

vodafone
नवी दिल्ली – आपल्या टूजी आणि थ्रीजी ग्राहकांना चांगलाच धक्का देत वोडाफोन इंडियाने देशभरातइंटरनेट दर तब्बल दुप्पटी पेक्षा जास्त दराने वाढवले आहेत.

प्रीपेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी ‘पे एज यू गो’ (PAYG) 4 पैसे प्रति 10 केबी राहील. यापूर्वी 10 केबी साठी कंपनी 2 पैसे इतका दर आकारत होती. कंपनीने नोव्हेंबर 2013 मध्येच दरांमध्ये 80 टक्के कपात करून 2 पैसे प्रति 10 केबी असा दर लागू केला होता. वोडाफोनचे हे नवीन दर झोनप्रमाणे टप्प्याटप्प्याने हे नवीन दर लागू करण्यात येणार आहेत.

कंपनीच्या प्रवक्त्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर, वोडाफोनने PAYG ग्राहकांसाठी मोबाईल इंटरनेट दरांत काही बदल केले आहेत. हे बदल लवकरच सगळ्या सर्कल्समध्ये लागू होणार आहेत, असे म्हणत या बातमीला दुजोरा दिला आहे.

Leave a Comment