रेल्वे आता थेट वैष्णोदेवीला जाणार!

railway
नवी दिल्ली – भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात जाण्यासाठी आता थेट रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे. कटरा या मुख्य तळापर्यंत जाणारी ही गाडी २०१४-१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पापूर्वीच भाविकांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-कटरा या २५ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे उद्‌घाटन याच महिन्याअखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचीही उपस्थिती राहणार आहे. एकूण ७ बोगदे आणि ३० लहान-मोठ्या पुलांवरून जाणार्‍या या रेल्वेमार्गाची सुरक्षितता चाचणी सातत्याने घेण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाच्या बांधकामासाठी साधारण अकराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘काश्मीर लिंक’ उपक्रमाचा एक भाग असलेल्या या रेल्वेमार्गामुळे रेल्वेगाड्या थेट कटर्‍यापर्यंत येऊ शकणार आहेत. जम्मू मेल आणि संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाड्याही थेट कटर्‍यापर्यंत धावतील.

Leave a Comment