ब्राझीलने केली कॅमरुनवर मात

brazil

ब्राझीलिया – फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील`बी`ग्रुपमध्ये ब्राझीलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत कॅमरुनसंघाचा पराभव केला आहे. या सामन्यात ४-१ असा दणदणीत विजय मिळवित बाद फेरीत ब्राझीलने प्रवेश केला आहे. या दमदार कामगिरीच्याु ब्राझीलने ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवले आहे.

पहिल्या सत्रात नेयमारने ब्राझीलसाठी सलग दोन गोल केले. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून ब्राझीलने आक्रमक खेळाला सुरुवात केली.१७ व्या मिनिटाला मध्यरक्षक लुईझ गुस्तावोकडून मिळालेल्या पासवर नेमारने चेंडूला गोल जाळयाची दिशा दाखवत ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. कॅमरुनने लगेचच प्रतिहल्ला चढवला. २६ व्या मिनिटाला मॅटिपने ब्राझीलच्या बचावफळीतील त्रुटींचा फायदा उचलत, कॅमरुनसाठी पहिला गोल करत बरोबरी साधून दिली.

त्यानंतर सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला नेमारने आपल्या पदलालित्याचे कौशल्य दाखवले. कॅमरुनच्या बचावपटूंना चकवत त्याने ब्राझीलसाठी दुसरा सुरेख मैदानी गोल केला. मध्यंतरापूर्वी ब्राझीलकडे २-१ अशी आघाडी होती. दुस-या सत्रात फ्रेडने ४९ व्या मिनिटाला आणि फर्नाडिन्होने ८४ व्या मिनिटाला ब्राझीलसाठी अनुक्रमे तिसरा आणि चौथा गोल करत विजय सुनिश्चित केला.या संपूर्ण सामन्यावर ब्राझीलची पकड होती.

Leave a Comment