कर्ज घेऊन कार घेण्याकडे वाढयेत चीनची प्रवृत्ती

china
चीनमध्ये आजही कार मालकीची असणे सफलतेचे आणि लग्झरीचे प्रतीक मानले जाते. मात्र आजही ८५ टक्के चीनी रोखीने कार विकत घेणे पसंत करतात. त्यामुळे वाहन लोन देणार्‍या कार कंपन्यांना व्यवसाय वाढीची फारशी संधी मिळत नव्हती. चीनची युवा पिढी मात्र या वाहन लोन देणार्‍या कार कंपन्यांसाठी आशेचा किरण ठरते आहे कारण पारंपारिक रोख मोजून कार विकत घेण्याची प्रथा ही पिढी मोडत असून सर्रास लोन काढून कार विकत घेण्यास प्राधान्य देताना दिसते आहे. या मुळे कार साठी लोन उपलब्ध करून देणार्‍या कार उत्पादक कंपन्यांना या देशात मोठे मार्केट खुले होऊ लागले आहे.

लोन काढून गाडी घेणार्‍यात २० ते ३० वयोगटातील युवकांचे प्रमाण मोठे आहे. या वयात कार खरेदी करण्याइतका पैसा साठत नाही. पण तरीही कारच्या मोहाने आणि प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून ही पिढी कर्ज घेऊन कार खरेदी करू लागली आहे. फोर्ड, बीएमडब्ल्यू, फॉक्सवॅगन, टोयोटो कॉर्प या कंपन्यांनी आत्तापर्यंत ८० कोटी युयानचे कर्जवाटप केले आहे आणि २०२५ पर्यंत हाच आकडा ५२५ अब्ज युआन म्हरजे ८४५.५ अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चीनमध्ये कार कर्ज देताना २० टक्के डाऊन पेमेंट करावे लागते. चीनी लोकांमध्ये बचतीचे प्रमाण चांगले असल्याने कर्ज घेऊन बुडविणार्‍याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे ऑटो फायनान्स कंपन्यांची चीनमध्ये व्यवसाय विस्तारावर विशेष नजर असल्याचे फोर्डचे प्रमुख जॉन लॉडर यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment