आता फूटबॉल सामन्यावरही सट्टा; नागपूरात ५० कोटींचा सट्टा

betting
नागपूर – नागपूर हे मध्य भारतातील सटोर्‍यांचे मोठे केंद्र आहे. सट्टेबाजांना सट्टा लावायला फक्त निमित्तच मिळाले पाहिजे, मग तो कोटींच्या घरातही नेण्यात त्यांना वेळ लागत नाही. सध्या ब्राझीलमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेतील सामन्यांवर नागपुरात रोज ५० कोटीचा सट्टा लागत असल्याची खळबळजनकमाहिती समोर आली आहे.

सध्या स्पर्धेची साखळी फेरी सुरू आहे. यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहे. जगज्जेता स्पेन, इंग्लंड या सारख्या बलाढय संघाला स्पर्धेतून बाहेरचा मार्ग दाखविला आहे. तर इटली व पोर्तुगल या देशांचा ‘नॉक आउट’ फेरीतील प्रवेश साखळीतील इतर निकालावर अवलंबून आहे. सुरूवातीच्या धक्कादायक निकालात सट्टेबाजांनी चांगलीच कमाई केली आहे. लवकरच बादफेरी सुरू होणार असल्यामुळे स्पर्धेच्या अन्य निकालाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. याचा फायदा घेत आणखी २० टक्क्यांनी सट्टेबाजारात वाढ होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत नागपूरच्या सट्टेबाजांनी चांगलीच माया गोळा केली होती. क्रिकेटपेक्षाही फुटबॉलचे चाहते अधिक असल्याने हा मौसमही ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न बुकी करीत आहे. गतवर्षी आयपीएल सामन्यातील ‘मॅच फिक्सिंग’ मुळे नागपूर चर्चेत आले होते.

Leave a Comment