अ‍ॅँडी मरे, व्हिक्टोरिया अझारेंकाची विजयी सलामी

andy-mare
लंडन – ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सोमवारी गतविजेता आणि तिसरा मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅँडी मरेने विम्बल्डन एकेरीत विजयी सलामी दिली. त्याने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा ६-१, ६-४, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. याबरोबरच गतविजेतेपद राखण्याच्यादृष्टीने मरेने चांगली सुरूवात केली.

तर दुसरीकडे आठवी मानांकित बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने क्रोएशियाच्या मिरॅना ल्युसिच-बॅरोनीला ६-३, ७-५ नमवत दुसरी फेरी गाठली. ऑस्ट्रेलियन ग्रॅँडस्लॅमनंतरचा अझारेंकाचा हा पहिला विजय ठरला. दुखापतीमुळे माजी अव्वल मानांकित अझारेंका फ्रेंच ओपन ग्रॅँडस्लॅममध्ये खेळू शकली नव्हती.

सहावा मानांकित चेक रिपब्लिकच्या टोमास बर्डिचनेही रोमानियाच्या व्हिक्टर हॉनेस्क्यूचा ६-७, ६-१, ६-४, ६-३ पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. पहिला सेट गमावूनही बर्डिचने वेळीच सावरले. अन्य लढतींमध्ये १७वी मानांकित ऑस्ट्रेलियाच्या सामंथा स्टॉसूरने विजयी सलामी दिली. तिने बेल्जियमच्या यानिना विकमेयरचा ६-३, ६-४ पराभव केला. १८वी मानांकित अमेरिकेच्या स्लोआन

स्टीफन्सला मात्र सलामीलाच पराभव स्वीकारावा लागला. तिला रशियाच्या मारिआ किरीलेन्कोने ६-२, ७-६ पराभूत केले. पुरुष एकेरीत १८वा मानांकित स्पेनच्या फर्नाडो वर्डास्कोला सलामीलाच धक्का बसला. ऑस्ट्रेलियाच्या मॅरिन्को मॅटोसेविचने वर्डास्कोवर ६-४, ४-६, ६-४, ६-२ मात केली.

Leave a Comment