अखेर उपनगरीय रेल्वे प्रवाश्यांना दिलासा

railway1
मुंबई – रेल्वेतील भाडेवाढीतून मोदी सरकारने मात्र मुंबईकरांना दिलासा दिला आहे. लोकलची भाडेवाढ अंशतः मागे घेण्यात आली आहे. उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना याचा फायदा मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.

सेकंडक्लासला ८० किलोमीटरपर्यंत दरवाढ नाही. सेकंडक्लासच्या पासची दरवाढही मागे घेण्यात आली आहे. मात्र फर्स्टक्लासची १४.२ टक्के दरवाढ कायम ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

रेल्वे भाडेवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील महायुतीच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाने आज रेल्वे मंत्री सदानंद गौड यांची भेट घेतली होती. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी या भाडेवाढीला मागे घेण्याबद्दल अनुकुलता दर्शवली होती.

Leave a Comment