श्रीलंकेच्या अटकेत तामिळनाडूचे ११ मच्छीमार

fisher-man
रामेश्वरम – श्रीलंकन नौदलाने पुन्हा समुद्र सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन तामिळनाडूच्या अकरा मच्छीमारांना अटक केली आहे. काटचाथीऊ आणि नेडूनथीऊच्या समुद्रामध्ये हे मच्छीमार मासेमारी करत असताना त्यांना अटक करण्यात आली.

तामिळनाडूतील पुडूकोटाय जिल्ह्यातील कोटायपट्टीनम गावाचे हे सर्व मच्छीमार रहिवासी आहेत. श्रीलंकन नौदलाने या मच्छीमारांना अटक केल्यानंतर कानकेनसनथुराई बंदरावरील पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिक न्यायालयात या मच्छीमारांना हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

या मच्छीमारांनी आपण आपल्या पारंपारिक भागात मच्छीमारी करत असल्याचा दावा केला आहे. समुद्र सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन श्रीलंकन नौदलाकडून वारंवार तामिळनाडूतील मच्छीमारांना अटक होत असते. मागच्याच आठवडयात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या मच्छीमारांच्या सुटकेसाठी तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

Leave a Comment