रेल्वे भाडेवाढ – उद्धव ठाकरे यांची पलटी

udhdhav
मुंबई – मोदी सरकारकडून रेल्वे भाडेवाढ केल्यानंतर ही भाडेवाढ मागे घेण्यासाठी दबाव आणू आणि मोदींची भेट घेऊ अशी घोषणा करणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली असून रेल्वे भाडेवाढ आवश्यकच होती असे मत सेनेचे मुखपत्र सामनातून व्यक्त केले आहे. मोदी सरकारने केलेल्या रेल्वे दरवाढीचे समर्थन करताना ही भाडेवाढ शेवटची असेल असे लिहून उद्धव यांनी रेल्वे हा पांढरा हत्ती झाला असून त्याला पोसणे अवघड असल्याचेही नमूद केले आहे.

गेल्या १० वर्षात रेल्वेची भाडेवाढ केली गेलेली नाही. सरकारला सबसिडी पोटी २८ हजार कोटींचे नुकसान सोसावे लागते आहे. त्यामुळे रेल्वे भाडेवाढीचा सरकारचा निर्णय योग्यच आहे असे उद्धव यांचे म्हणणे आहे. मोदींकडे जादू नाही. जनतेच्या या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत मात्र त्या पुर्‍या करण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल असेही मत यांनी व्यक्त केले आहे. रेल्वेच्या प्रवासी दरात १४.२ तर मालवाहतूक दरात ६.५ टक्के भाडेवाढ करण्यात आली असून ती उद्यापासून म्हणजे २५ जूनपासून अमलात येत आहे.

Leave a Comment