राष्ट्रवादीत मोठे बदल- पवार स्वतः घालताहेत लक्ष

pawar
मुंबई- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे बदल केले जात असून स्वतः शरद पवार यांनीच या बदल्यांत लक्ष घातले असल्याचे समजते. विधानसभा स्वबळावर लढविण्याची शक्यता लक्षात घेऊन हे बदल केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे तर जलसंपदा मंत्रीपद प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे सोपविले जात असल्याचे समजते. बुधवारी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली गेली असून त्यात या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत.

या बैठकीसाठी नेते, मंत्री, पदाधिकारी यांना मिमंत्रित केले गेले आहे. यावेळी प्रदेश कार्यकारणीतही मोठे बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाला सध्यातरी हात लावला जाणार नसल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते. वास्तविक नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ पराजित झाले आहेत. त्यांच्या ओबीसी कार्डचा म्हणावा तसा फायदा पक्षाला झालेला नाही. इतकेच नव्हे तर नाशिक राष्ट्रवादीच्या हातून गेल्यातच जमा आहे. तरीही सध्या भुजबळ यांना हात लावला जाणार नाही असेही समजते.

Leave a Comment