मेट्रो दरवाढ अटळ; न्यायालयाने फेटाळली याचिका

metro
मुंबई – न्यायालयाने आज मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधातील याचिका फेटाळून लावल्याने ८ जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मेट्रोचे तिकीट दर वाढवू नयेत यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने आज ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे रिलायन्सच्या पत्रकानुसार मेट्रोचे नवे दर १० ते ४० रुपयांपर्यंत असणार आहेत. ८ जुलैपासून हे नवे दर लागू होतील.

Leave a Comment