स्पीलबर्ग – मर्सिडीजचा जर्मन ड्रायव्हर निको रोसबर्गने ग्रिडवर तिसर्या स्थानापासून सुरुवात करूनही, त्याने ऑस्ट्रेलियन ग्रां प्री फॉर्मुला वनची शर्यत जिंकली आणि खिताबावर आपले नाव कोरले.
निको रोसबर्ग ऑस्ट्रेलियन ग्रां प्री फॉर्मुलाचा विजेता
निकोच्या या विजयामुळे त्याचा संघदेखील गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. निकोचा जोडीदार लुइस हॅमिल्टन या शर्यतीत दुसर्या स्थानी राहिला. तर, तीन वेळचा विश्वविजेता रेड बुल ड्रायव्हर सॅबेस्टियन व्हीटल शर्यतच पूर्ण करू शकला नाही. दुसर्या सराव शर्यतीत ड्रायव्हर फिलिप मासा चौथ्या स्थानी राहिला. तसेच त्याचा साथीदार वालटेरी बोल्टस तिसर्या स्थानावर होता. बोल्टसने आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदा पोडियमवर जागा बनविली. फेरारीच्या फर्नांडो अलोंसो पाचव्या, सहारा फोर्सचा सर्गियो पेरेज सहाव्या आणि मैक्लारेनच्या केविन मर्गुसन सातव्या आणि रेडबुलचा डॅनियल रिकार्डोे आठव्या स्थानावर राहिला.
या विजयामुळे निकोने एकूण १६५ गुणांची कमाई करीत, तो ड्रायव्हिंग टेलीमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचा साथीदार लुईस १३६ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. ८३ गुणांसोबत अलोंसो तिसर्या आणि व्हीटल ६० गुणांसोबत चौथ्या स्थानावर आहे. तसेच मर्सिडिजचा संघ ३०१ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. १४३ गुणांसह रेडबुल दुसर्या आणि ९८ गुणांसह फेरारी तिसर्या स्थानावर आहे.