एटीएमची रिसीट देतेय गंभीर आजारांना निमंत्रण

atm
एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा अनेकजण मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. मात्र पैसे काढल्यानंतर मिळणारी रिसीट ही लोकांसाठी धोकादायक असून ती अधिक काळ हातात ठेवली गेली तर त्यापासून कॅन्सर सारख्या आजारांचा धोका होऊ शकतो असे औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब अंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायन विभागात झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

यावर करण्यात आलेल्या संशोधनात रिसीट स्वरूपात मिळणारा हा पातळ कोटिंगचा कागद मानवी शरीरासाठी नुकसानकारक आहे. त्यावरचा मजकूर थर्मलप्रिंटने प्रिंट केलेला असतो आणि यासाठी जी रसायने वापरली जातात ती मानवी शरीरात शोषली जातात. ही विषारी रसायने कॅन्सर, डायबेटिस, नंपुसकत्व, मेद वाढणे, प्रतिबंधक शकती कमी होण्यास कारणीभूत ठरतात. ही रिसीट ५ सेकंद हातात राहिली तरी त्यावरील रसायने शरीरात जातात. हात ओलसर असेल तर रसायने अधिक प्रमाणात शोषली जातात असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मोठे मॉल्स, पेट्रोल पंप, बस तिकीटे, ऑनलाईन लॉटरी यांच्या ज्या रिसीट मिळतात त्या कागदावरही ही रसायने मौजूद असतात. यामुळे या रिसीटही आरोग्यास धोकादायक ठरू शकतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. न्यूयॉर्क मध्ये या रसायनांच्या वापरास प्रिटींगमध्ये बंदी असून ती मोडणार्‍यास ३० हजाराचा दंड केला जातो. फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन, मेरीलँड, वॉशिग्टन, न्यूयॉर्क, मिनिसोटा, मॅसेच्युसेट व व्हेरमाऊंट येथेही कागदावर प्रिंटींग करताना ही रसायने वापरण्यास बंदी आहे.

Leave a Comment