‘अलास्का’ला 7.9 रिश्‍टर तीव्रतेचा भूकंप

earthqueak
अलास्का – अमेरिकेतील अलास्कामधील ऍलेउतीन बेटाजवळ मोठा भूकंप झाल्यामुळे त्सुनामीचा इशारा आज देण्यात आला होता, मात्र येथील राष्ट्रीय त्सुनामी इशारा केंद्राकडुन भूकंपानंतर काही तासांमध्ये त्सुनामीचा इशारा मागे घेतला आहे. या भुकंपाचा केंद्रबिंदु येथील लिटल सित्कीन बेटांच्या नेऋत्येस 21 किलोमीटर इतक्‍या अंतरावर होता, त्याची तीव्रता 7.9 रीश्‍टरस्केल एवढी होती. मात्र येथे भूकंपामुळे कुठलीही हानी झाल्याचे वृत्त नसल्याचे अलास्का राज्याचे सुरक्षा आणि आपत्कालीन नियोजन विभागाचे प्रवक्ते जेरेमी जीडेक यांनी स्पष्ट केले आहे.

अडाक या येथील शहरामधील नागरिकांनी त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर त्वरित येथील ठिकाण सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला होता. की समुद्राच्या पाण्याने किनारापातळी सोडली असुन तेथील नागरिकांनी उंच टेकडीच्या ठिकाणी जावे. “”नागरिकांनी आपल्या निवासस्थानी सतर्क रहावे. जर काही त्सुनामीचे संकेत आढळल्यास इशाऱ्याचा भोंगा वाजविण्यात येईल. यावेळी नागरिकांनी टेकड्यांवर माघारी जावे,‘‘ असे शहराचे व्यवस्थापक लॅयटोन लॉकेट यांनी सांगितले.

येथील अमचित्का बेटाजवळ, याचबरोबर अडाक आणि शेमया येथेही उंच लाटा उसळल्याचे सूत्रांनी सांगितले. या भूकंपाचा अडाक व आजुबाजूच्या भागास मोठा फटका बसला.

Leave a Comment