मंदा म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश!

manda-mhatre
मुंबई – गणेश नाईक यांच्यावर जहरी टीका करत राष्ट्रवादीला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. म्हात्रे यांनी मागील सोमवारी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

म्हात्रे यांनी आपल्याला राष्ट्रवादीत अनेक त्रास होत असल्याचे राजीनामा देतांना म्हटले होते. तसेच गणेश नाईक हे एकाधिकारशाहीने वागत असल्याचा गंभीर आरोपही म्हात्रे यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा प्रदेश कार्यालयात दिला होता.

म्हात्रेंनी राष्ट्रवादीच्या सदस्य़त्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची शिवसेनेच्या प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली होती. यामुळे म्हात्रे भगव्याच्या छत्रछायेखाली येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

यावेळी मंदाताई यांच्या शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. असे सांगत म्हात्रेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत सांगणे टाळले आहे. परंतू मंदाताईंना शिवसेनेचा पूर्णपणे पाठींबा असल्याचे सांगत निलम गोऱ्हेंनी म्हात्रे शिवसेनेत येणार असल्याचे संकेत दिले होते.

तर दुसरीकडे मंदा म्हात्रे यांनी निलम गोऱ्हे यांच्या भेटीने आणि पाठींब्यामुळे नव्याने उमेद निर्माण झाल्याचे म्हटले होते. निलम गोऱ्हे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या म्हात्रे यांनी मात्र आता आपण भाजप मध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment